शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी गेल्याने अभियंत्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:43 IST

कोपार्डे : खुपीरेपैकी शिंदेवाडी (ता. करवीर) येथील स्वप्निल दाजी वडगावकर (वय २४) या युवकाने नोकरी गेल्याच्या नैराश्येतून रविवारी पहाटे घरात गळफास लावून आत्महत्या केली. एकुलत्या मुलाने आत्महत्या केल्याने आई-वडिलांसह कुटुंबीयांना धक्का बसला आहे.स्वप्निल हा मॅकेनिकल इंजिनिअर होता. काही दिवस त्याने पुणे येथे एका कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी केली होती. मात्र, ...

कोपार्डे : खुपीरेपैकी शिंदेवाडी (ता. करवीर) येथील स्वप्निल दाजी वडगावकर (वय २४) या युवकाने नोकरी गेल्याच्या नैराश्येतून रविवारी पहाटे घरात गळफास लावून आत्महत्या केली. एकुलत्या मुलाने आत्महत्या केल्याने आई-वडिलांसह कुटुंबीयांना धक्का बसला आहे.स्वप्निल हा मॅकेनिकल इंजिनिअर होता. काही दिवस त्याने पुणे येथे एका कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी केली होती. मात्र, ती कंपनी बंद पडल्यामुळे नोकरी गेल्याने तो निराश होता. स्वप्निल कोल्हापूर एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला जात होता, पण तिथे मिळणारा पगार तुटपुंजा वाटत असल्याने तो नाराज होता. आई-वडिलांनी शिक्षणासाठी केलेल्या खर्चाचा ताण त्याच्या मनावर असल्याने स्वप्निलला त्याचे वडील समुपदेशन करत होते. त्याचे नैराश्य दूर करण्यासाठी कुटुंबीय प्रयत्न करीत होते. नातेवाइकांनीही स्वप्निलला धीर देत चांगली शेती आहे. त्याशिवाय एकुलता आहेस, असा सल्लाही दिला होता. त्यानंतर तो काही दिवस मिळून मिसळून वागल्याने आई-वडील काहीसे निश्चिंत झाले होते.रविवारी पहाटे पाच वाजता स्वप्निलचे आई- वडील व लहान बहीण गोठ्याकडे गेले होते. दूध नेण्यासाठी स्वप्निल बराच वेळ झाला तरी आला नाही म्हणून बहीण घरी आली, तर स्वप्निलने घरात माडीवर दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. बहिणीने आरडाओरडा केल्यावर आई-वडील व नातेवाइकांनी घराकडे धाव घेतली, पण तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. स्वप्निल हा आई-वडिलांना एकुलता होता.